पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर आणि लायन्स क्लब ऑफ कोडोली यांचा 2025-26 चा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथ समारंभ पार पडला यावेळी सन 2025-26 करिता लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर साठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर नागेश वाले, सेक्रेटरी अरविंद पवार खजिनदार संभाजीराव पवार यांची निवड करण्यात आली.तर लायन्स क्लब ऑफ कोडोली अध्यक्षपदी सागर येजरे,सेक्रेटरी सविता येजरे आणि खजिनदार पदी अनिरुद्ध घोरपडे यांची निवड करण्यात आली,लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे प्रथम उपप्रांतपाल राजेंद्र भाई कासवा, पीडीजी वासुदेव कलगटगी यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन पदाधिकारी व सदस्यांना शपथ देण्यात आली.
या शपथ ग्रहण समारंभास पीडीजी विजयकुमार राठी,रीजन 4 चे चेअरमन सुनील चव्हाण,झोन-1 चेअरमन महेंद्र बालर, सदानंद रणदिवे,सचिन मगदूम,सर्जेराव पाटील,डॉक्टर राजन अतिग्रे,आर.पी.माळी तसेच कोल्हापूर,सोलापूर,इचलकरंजी,कुरुंदवाड येथून आलेले लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…