
राधानगरी /प्रतिनिधी मिलिंद कांबळे
राधानगरी एसटी आगाराच्या 2025 26 साला करिता शिवसेना प्रणित शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेनेची कार्यकारणी निवड आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी चालक अनिल गोविंद कांबळे तर उपाध्यक्षपदी चालक संग्राम विष्णू पाटील तर सचिव पदी लहू लक्ष्मण कारेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष तानाजीराव चौगले होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना अनिल कांबळे यांनी शिव परिवहन वाहतूक आणि कामगार सेना ही एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी झगडणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि वाहक चालक वाहक आणि इतर कामगारांच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली. या कार्यकारणी निवडी वेळी सहसचिव म्हणून शिवाजी संकपाळ कार्याध्यक्ष म्हणून संभाजी कवडे संघटक पदी,सचिन पाटील हिंदुराव पाटील, खजिनदरपदी ो हन तेली, सातापा कांबळे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेंद्र परीट, पांडुरंग चौगुले, शरद पाटील महिला प्रतिनिधी म्हणून शितल पाटील, कायदेशीर सल्लागार म्हणून भिकाजी पाटील ,रामदास पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी एस के पाटील, दिपक काशिद, जावेद नावळेकर प्रमुख मार्गदर्शक आणि सदस्य कायदेशीर सल्लागार आदी पदांची भरती करण्यात आली. यावेळी चालक वाहक मेकॅनिकल मोठ्या संख्येने उपस्थित होते.


