Home Uncategorized शिरोळ तालुक्यातील १० गावांना नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरोळ तालुक्यातील १० गावांना नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

3 second read
0
0
91

जयसिंगपूर : प्रतिनिधी
शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शिरोळ तालुक्यातील १० ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला शासनाने मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील ज्या गावात ग्रामपंचायत इमारत उपलब्ध नाही तसेच ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे. त्या गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केली होती, त्यानुसार शिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, शेडशाळ, शिरटी, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण व हरोली या 10 ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी २५ लाखाचा निधी मंजूर केला आहे. या अगोदर शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, गणेशवाडी, तेरवाड, टाकवडे, नवे दानवाड या गावातील ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी मंजूर झाला होता या ग्रामपंचायतीचे काम आता पूर्ण झाले आहे.

या होणाऱ्या नविन इमारतीत सरपंच, ग्रामसेवक, सहाय्यक अधिकारी यांचे स्वतंत्र कक्ष, हॉल, संगणक सुविधा, मीटिंग रूम, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात स्थानिक प्रशासन इमारतींचे नव्याने बांधकाम व्हावे, यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे, या अगोदर त्यांनी शिरोळ तालुक्यातील २० गावातील गाव चावडी इमारत बांधकामासाठी निधी मंजूर केला होता, त्या इमारतीचे बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३००० पेक्षा अधिक आहे व ज्यांच्याकडे स्वतःची इमारत नाही किंवा अस्तित्वातील इमारत धोकादायक अवस्थेत आहे, अशा ग्रामपंचायतींसाठी नवीन इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कोथळी, उमळवाड, शेडशाळ, शिरटी, कवठेसार, जांभळी, टाकळी, नांदणी, शिरढोण व हिरोली या १० ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे.

येत्या काही महिन्यांत या ठिकाणी इमारत कामाला होणार असून, स्थानिक नागरिकांना आधुनिक व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय तसेच नागरी सेवा केंद्राचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे सहकार्यही लाभले. यामुळे शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायतींच्या पायाभूत सुविधा भक्कम होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…