Home Uncategorized शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्षपदी संदीप बिरणगे यांची निवड

शिरोळ तालुका मातंग समाज अध्यक्षपदी संदीप बिरणगे यांची निवड

3 second read
0
0
159

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेची नुतन कार्यकारिणी शिरोळ विश्रामगृह या ठिकाणी मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. किसनराव आवळे (अण्णा) यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शक माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली.

शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष म्हणून संदिप बिरणगे (सै. टाकळी) तर सचिव म्हणून उमेश आवळे (तेरवाड) यांची निवड झाली तसेच युवा अध्यक्ष म्हणून विशाल कांबळे (चिपरी) व कार्याध्यक्ष अनिल लोंढे (शिरोळ) यांची व महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती संगीता व्हसमाने (चिपरी) यांची निवड करण्यात आली. शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे जेष्ठ सल्लागार अरुण कांबळे, उदय मिसाळ, श्रीपती सावंत, धनपाल कनवाडे, खंडू भोरे, संजय आवळे, दिनकर आवळे, संजय कांबळे, लक्ष्मण गुजरे, नितीन वायदंडे, सुधीर आदमाने, रमेश बिरणगे, श्रीनिवास आवळे, बाबुराव ऐवाळे, प्रमोद तिवडे, अशोक मळगे यांनी ही अध्यक्ष निवड प्रक्रिया मुलाखत घेऊन पार पाडली.

यावेळी माजी अध्यक्ष शशिकांत घाटगे, माजी युवा अध्यक्ष कुणाल कांबळे, माजी उपाध्यक्ष सागर बिरणगे, संदिप बिरांजे, माजी संपर्क प्रमुख रविकांत जगताप, माजी संघटक सुनील कांबळे, उमेश मोरे, बाळासो गायकवाड, राजू कांबळे, पिंटू (वेल्डर) कांबळे आदी उपस्थित होते, प्रास्ताविक संदिप बिरणगे व स्वागत शशिकांत घाटगे यांनी केले तर आभार उदय मिसाळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…