Home Uncategorized कला शाखा वाचवा अशी हाक :- सोमवारी धरणे आंदोलन

कला शाखा वाचवा अशी हाक :- सोमवारी धरणे आंदोलन

4 second read
0
0
61

कला शाखेकडे विद्यार्थीचा ओढा कमी होत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कला शाखा वाचविण्यासाठी व शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणा-या मागण्यांसाठी जिल्हातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक सोमवारी, (ता.२९ ऑगस्ट) दुपारी दीड वाजता आंदोलन करणार आहेत. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात कला शाखा वाचवा अशी हाक दिली जाणार आहे.

शहरी व ग्रामीण भागातील ज्युनिअर कॉलेजमध्ये सध्या तुकडीसाठी जी पटसंख्या आहे त्यामध्ये बदल करावेत अशी ही शिक्षकांची मागणी आहे. यासंबंधी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांच्याशी चर्चा केली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रा. टी. एस. दुर्गी, दुर्गी, सचिव प्रा. संजय मोरे, सहसचिव प्रा. बी. के. मडिवाळ, कोषाध्यक्ष प्रा. शिवाजीराव होडगे आदींचा समावेश होता.

राज्यातल कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणा-या न्याय्य व प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी संघटनेच्या वतीने आंदोलने केली जात आहेत. सोमवारी, २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेने केले आहे.कोल्हापुरी कारभारसाठी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…