Home Uncategorized जयसिंगपूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमाला केले जेरबंद : ६० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

जयसिंगपूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमाला केले जेरबंद : ६० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत

3 second read
0
1
166

जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून जयसिंगपूर शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून त्याच्याकडून गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. १३ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास मनीषा ऑटोमोबाईलजवळ नांदणी नाक्याला जाणाऱ्या रिंगरोडलगत उघड्यावर करण्यात आली. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस अंमलदार निलेश मांजरे ताहीर मुल्ला वैभव सुर्यवंशी बाळासाहेब गुप्ते कोळी सागर सूर्यवंशी होमगार्ड मिलन शिंगाडे यांचा समावेश होता.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी दिनांक १३ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर शहरातील मनीषा ऑटोमोबाईल शोरूम जवळ महादेव विठ्ठल धोत्रे ( वय ३९, रा. बावन्न झोपडपट्टी, जयसिंगपूर ) याने साडेपाच हजार किंमतीचा ४६३ ग्रॅम वजनाचा गांजा हा हैदर इराणी ( रा. इराणी मस्जिदजवळ, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) याच्याकडून विकत घेतला होता. पोलिसांनी या दोघा संशयित आरोपींना विनापरवाना गांजा जवळ बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गांजासह मोबाईल तसेच बजाज कंपनीची मोटरसायकल असा एकूण ६० हजार ५०० रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत

दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री संदर्भात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्यात अमली पदार्थ विक्रीवर प्रतिबंध करून गांजा ओढणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…