Home Uncategorized संयुक्त बांबवडे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन

संयुक्त बांबवडे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन

3 second read
0
0
108

मलकापूर रोहित पास्ते :

शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे या ठिकाणी श्री शिव फाउंडेशन बांबवडे प्रणित यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गेल्या आठ वर्षापासून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 19 फेब्रुवारी 2025 रोजी वक्तृत्व स्पर्धा, 20 फेब्रुवारी 2025 रोजी रक्तदान शिबिर, धनगरी ढोल स्पर्धा, 21 फेब्रुवारी 2025 रोजी गाडी मागून श्वान स्पर्धा, खेळ रंगला पैठणीचा (होम मिनिस्टर) तसेच 22 फेब्रुवारी 2025 रोजी स्लो बाईक स्पर्धा, हलगी स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. व 23 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजन्मोत्सव सोहळा व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

मलकापूर प्रतिनिधी:रोहित पास्ते आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सर्…