Home Uncategorized राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

2 second read
0
0
238

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे

राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाला. राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने दर वर्षी गणेश जयंती साजरी केली जाते. या मंडळास ५१ वर्ष पूर्ण होत असून. या मंडळाकडून राधानगरीत २००० साली या गणेश मंदिराची उभारणी केली. तेव्हा पासून विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाने गणेश जयंती साजरी केली जाते. सकाळच्या सत्रात अभिषेक, होम हवन, सत्यनारायन महापूजा सपन्न झाली. दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्म काळ सपन्न झाला. महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. राधानगरी आणि परिसरातील बनचिवाडी, आयरेवाडी, हुडा, शेटकेवाडी, हत्तीमहाल, पडळी, फेजीवडे व पंचक्रोशीतील हजारो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.या वेळी गणेश तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

दुग्धतंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गोकुळ दूध संघ तसेच इंडियनडेअरी असोसिएशनचे…