Home Uncategorized प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू समारंभ

प्राथमिक आरोग्य केंद्र सरूड येथे मकर संक्रांती निमित्त हळदी-कुंकू समारंभ

3 second read
0
1
106

प्रतिनिधी:

तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सरुड येथे मकर संक्रांती निमित्त हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली इंटर्ण अंकिता कुंभार, समुदाय आरोग्य अधिकारी त्रिशला देवी मोहीते व सुप्रिया पाटील औषध निर्माण अधिकारी व आरोग्य सेविका तसेच परीचय गट पर्वतक हजर होत्या.

कार्यक्रमाचे औचित्य साधुन कार्यक्रमावेळी हळदीकुंकू बरोबर स्टिलच्या प्लेटा, फुले या प्रमाणे प्रत्येकाला वाटप करण्यात आले. या वेळी ओपीडी साठी हजर असणाऱ्या महिला लाभार्थ्यांना मोफत आरोग्य तपासणी व वैयक्तिक स्वच्छता, महिलांचे आजार व उपचार निरोगी या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थितीत होते.

केके न्यूजसाठी राहुल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…