Home Uncategorized चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड

चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका परीट यांची बिनविरोध निवड

3 second read
0
0
74

शिरोळ : प्रतिनिधी

   चिपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपिका नितीन परीट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच सौ. निर्मला कोळी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी ही निवड करण्यात आली. चिपरी ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच दिपिका परीट यांच्या रुपाने परीट समाजाला संधी मिळाली आहे. चिपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार सकाळी मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती. सरपंच पदासाठी परीट यांचा एकमेव अर्ज आल्याने सभाध्यक्ष संतोष पाटील यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडीनंतर मावळत्या सरपंच सौ. कोळी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. निवडीनंतर परीट समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. यानंतर गावातील प्रमुख मार्गावरुन त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तलाठी सुनिल खामकर, गणेश कांबळे, शिवाजी जाधव, बबीता पांडव, सुरेश भाटिया, अरुण कांबळे, शरद काडे, अर्चना पाटील, सुजाता पांडव, आनंदी जगदाळे, विश्वजीत कांबळे, संजय कांबळे, पोलिस पाटील सतिश कांबळे, अमृता गावडे, अनिकेत कांबळे, जयपाल कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…