Home Uncategorized कनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो कुपाडे यांची बिनविरोध निवड

कनवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो कुपाडे यांची बिनविरोध निवड

3 second read
0
0
48

कनवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादासो उर्फ राजू आण्णासो कुपाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी इरफान बुरान होते. उपसरपंच दीपक पाटील यांनी आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी दादासो कुपाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच इरफान बुराण यांनी त्यांची उपसरपंचपदी बिनविरो निवड घोषित केली.

राजू कुपाडे यांची निवड घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. या ग्रामपंचायतीवर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या आघाडीची सत्ता आहे.

या आघाडीचे प्रमुख मुन्ना बाबा कनवाडकर सरकार, दिपक पाटील, अख्तर पटेल, अहमद बुराण, चाँदबुखारी इनामदार, सौ. सुनिता कांबळे, सौ. समिना इनामदार, सौ. कविता गौराज, सौ. शबाना सनदी, सौ. दिपाली कांबळे, सौ. यास्मीन इनामदार आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत अधिकारी एन.एच. मुल्ला यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…