शिरोळ : प्रतिनिधी
स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील साहेब यांच्या पत्नी व श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव आप्पासाहेब पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णाबाई आप्पासाहेब पाटील यांचे वयाच्या 102 व्या वर्षी अल्पश: आजाराने आज पहाटे निधन झाले. स्वर्गीय आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हे आपल्या आयुष्यातील सात दशके शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी या कालावधीत अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून दत्त उद्योग समुहातील संस्था देशभरात नावारूपास आणल्या. त्यांच्या या कार्यकिर्दीत त्यांना अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. परंतु या कालात श्रीमती कृष्णाबाई पाटील या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पूर्ण केली होती. त्यांनी मुलगा गणपतराव पाटील, मुलगी व चार नाती यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या संस्कारामुळेच त्यांचे चिरंजीव गणपतराव पाटील हे शेती व सहकार क्षेत्रात तळवळीने व जिद्दीने कार्यरत आहेत. श्रीमती कृष्णाबाई पाटील यांना रोटरी क्लब ऑफ सांगली कडून आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या स्थितप्रज्ञ स्वभावामुळेच त्यांना 102 वर्षाचे आरोग्यपूर्ण आयुष्य लाभले. सा. रे. पाटील साहेबांच्या प्रमाणे त्यांनीही मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या आज पहाटे निधनानंतर शासकीय वैद्यकीय विद्यालय मिरज येथे देहदान करण्यात आले.
दरम्यान कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त उद्योग समूहातील कामगारांच्या वतीने शोकसभा घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, चार नाती, नातजावाई, परतवंडे असा परिवार आहे.
Check Also
शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे केंद्र म्हणजे ब्रिलीयंट स्कूल ; आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे प्रतिपादन
शिरोळ : प्रतिनिधीरंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूल शिरोळ य…