शिरोळ : प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या माती उत्खनन करून वाहतुक केली जात आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्यावतीने शिरोळ तहसिदार कार्यालयास देण्यात आले आहे.
शिरोळ तहसिलदार कार्यालयासमोरून मोठ्या प्रमाणात मातीची वाहतुक सुरू होती. माती वाहतुक करणाऱ्या वाहन चालकाकडे वाहतूक परवाना पावती मागितल्यास संबंधीत चालकाने गुरूवार २६ तारीख असताना बुधवार दि. २५ तारखेची पावती त्याने दाखवली. त्यामुळे बुधवारच्या रॉयल्टीवर गुरूवारी बेकायदेशीर माती वाहतूक सुरू होती. या वाहनाबरोबरच अन्य चार वाहने माती भरून जात होती. ती वाहने तात्काळ परत बोलवून रॉयल्टी चुकवून जाणारी वाहनांवर कारवाई करावी. तसेच माती भरलेल्या वाहनासोबत एक ब्रस मातीची पावती होती. तर वाहनात पाच ब्रास माती भरलेली होती. यामुळे बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडवणाऱ्या माती उत्खनन करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशच्यावतीने देण्यात आले. आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरोळ तहसिल कार्यालयास गुरूवारी सदरचे निवेदन दिले आहे.