Home Uncategorized महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने पंचगंगा स्मशानभुमीस 52 हजार शेणी

महापालिका कर्मचाऱ्याच्यावतीने पंचगंगा स्मशानभुमीस 52 हजार शेणी

2 second read
0
0
28

कोल्हापूर ता.15 :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने 52 हजार शेणी प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभुमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी देतात. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या शेणी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली 11 वर्षे पंचगंगा स्मशानभुमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम वर्षी 10 हजार शेणी, दुसऱ्या वर्षी 20 हजार शेणी, तिसऱ्या वर्षी 30 हजार, फायर एक्स्टयुगेशर व भिंतीवरील मोठे घडयाळ व चौथ्या वर्षी 30 हजार शेणी, पाचव्या वर्षी 40 हजार व सहाव्या वर्षी 40 हजार, सातव्या वर्षी 40 हजार शेणी, नवव्या वर्षी 35 हजार, दहाव्यावर्षी 51 हजार व यावर्षीही 52 हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभिंयता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, एलबीटी अधिक्षक विश्वास कांबळे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…