Home Uncategorized अंबप येथे धारदार शस्त्राने वार करून १९ वर्षीय तरुणाचा खून

अंबप येथे धारदार शस्त्राने वार करून १९ वर्षीय तरुणाचा खून

2 second read
0
0
159

हातकणंगले : प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील १९ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे. यश किरण दाभाडे वय वर्ष १९ असे मृत तरुणाचे नाव असून घटनास्थळी पेठ वडगाव पोलीस दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील बौद्ध समाजाच्या पाण्याच्या टाकीजवळ यश किरण दाभाडे या तरुणाचा धारदार हत्याराने खून करण्यात करण्यात आल्याने अंबप गावात खळबळ उडाली आहे. खुनाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवी, पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची पाहणी करून पंचनामा सुरू आहे. अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसले तरी जुन्या हाफ मर्डर गुन्ह्यातून हा खून झाला असावा अशी चर्चा अंबप शहरात सुरू आहे. अधिक तपास पेठ वडगाव पोलीस करत आहेत. खुनाच्या बातमीमुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…