२० एप्रिल २०२४
पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निघृण खून केला. ही घटना आज (दि.२०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंबप येथे घडली. आमिर करीम मुल्ला (वय ३२ रा. अंबप ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित खंडू वाघमोडे याला वडगाव पोलिसांनी दोन तासांतच ताब्यात घेतले आहे.
