Home Uncategorized युवकांनी शहीद भगतसिंगांचा आदर्श घेऊन राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्न करावा..कॉम्रेड आकाश भास्कर

युवकांनी शहीद भगतसिंगांचा आदर्श घेऊन राष्ट्रउभारणीसाठी प्रयत्न करावा..कॉम्रेड आकाश भास्कर

3 second read
0
2
442

शहीद भगतसिंग यांची 117 वी जयंती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन कोल्हापूर यांच्यावतीने समाज सुधारकांची पुस्तके व शहीद भगतसिंग यांची प्रतिमा देऊन श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुडित्रे या ठिकाणी साजरी करण्यात आली.
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन कोल्हापूर यांच्या वतीने समाजसुधारकांची पुस्तके व भगतसिंगांची प्रतिमा देऊन जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ए डी पाटील सर यांनी केले.यावेळी बोलताना त्यांनी कॉम्रेड आकाश भास्कर यांची ओळख व ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली. कॉम्रेड आकाश भास्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना भारत हा युवकांचा देश आहे. युवकांनी समाज व राजकारणात पुढे येऊन राष्ट्र निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे आहे. भगतसिंग यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी आपल्या न्याय व हक्कासाठी निर्भीडपणे व्यवस्थेशी लढा देणे आवश्यक आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक आर.डी मोरे यांनी युवकांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या युवकांचा आदर्श घेऊन आपले जीवन उज्वल बनवावे असे मत व्यक्त केले. यावेळी ज्युनियर कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…