मलकापूर प्रतिनिधी:
शाहुवाडी तालुका महसूल कर्मचारी संघटने च्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाठी संतोष देवराज पवार यांचा तलाठी यांची निर्गुण हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून शाहुवाडी तालुका महसूल कर्मचारी संघटना चे अध्यक्ष अमर सुतार यांचे वतीने व शाहुवाडी तलाठी मंडल अधिकारी संघटना यांच्यावतीने एक दिवसीय लक्षणीय काम बंद आंदोलन पुकारत सदरच्या घटनेचा निषेध करण्यात आला.

सदरची घटना अत्यंत निंदनीय असून एका महसूल कर्मचाऱ्यांचा कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून निर्गुण पणे खून होतो ही घटना अत्यंत पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून निंदनीय आहे. यावेळी महसूल कर्मचारी संघटना तलाठी संघटना मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. सदरच्या घटनेचे सखोल चौकशी होऊन या घटनेतील आरोपींना अटक झाली पाहिजे अशी मागणी यावेळी कर्मचारी यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली व सदरच्या घटनेचे निवेदन नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना देण्यात आले.
यावेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष अमर सुतार तलाठी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण ,पन्हाळा डिव्हिजन संघटनेचे अध्यक्ष एस.एस. बदडे, सचिन कुमार, प्रसाद मोहिते, डी.एम. लिंबाळकर, विनोद कुमार कांबळे, अनिकेत ढाले, कदम, सौ. एस. जी. नायकवडी तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे साताप्पा कळंत्रे, मारुती मकर, जयश्री गजगेश्वर, मानसिंग भोसले, राहुल भोसले, अभिजीत काशीद, एस.बी. चौगुले यांच्यासह तलाठी महसूल कर्मचारी बहुसंख्याने उपस्थित होते.


