Home Uncategorized श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी रत्नागिरी जिल्हा पोलीस पदी निवड

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी रत्नागिरी जिल्हा पोलीस पदी निवड

4 second read
0
0
101

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित,श्रीमती शोभाताई कोरे शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर – मलकापूर मध्ये गोगवे ता. शाहूवाडी गावची व सदर महाविद्यालयाची सन २०२३-२४ मधील कला शाखेची अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुमारी कामिनी लक्ष्मण तळप हिची अत्यंत खडतर परिस्थितीत रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती मध्ये पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या, स्टाफ च्यावतीने समन्वयक प्रा. व्ही.एस.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक श्री पी.जे.कांबळे, इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक श्री.आर.एस. पाटील , इतर सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कुमारी कामिनीच्या यशात श्री.वारणा शिक्षण समूहाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉ.विनयरावजी कोरेसाहेब, श्री.वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. डॉ.व्ही व्ही कर्जिंन्नी सर व महाविद्यालयातील स्टाफचे मुख्य योगदान असल्याचे मत या प्रसंगी कुमारी कामिनी येणे व्यक्त केले. महाविद्यालयामार्फत तिच्या भावी वाटचालीस सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…