Home Uncategorized श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, मलकापूर येथे आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, मलकापूर येथे आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा

4 second read
0
0
102

मलकापूर प्रतिनिधी:

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर, संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर-मलकापूर, ता. शाहूवाडी जि.कोल्हापूर, येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार डॉ. विनयरावजी कोरे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो.डॉ. विलास कार्जिनी सर यांच्या प्रेरणेने ‘14ऑगस्ट ’ रोजी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागा मार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून व्याख्यान आयोजित करून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. ‘क्लिक से प्रगती तक: सतत विकास के लिए युवा डिजिटल रास्ते’ आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या 2024 थिमला अनुसरून ‘किशोर वयातील मुली व मोबाईलचा योग्य वापर’या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सदर व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री.क्रांतीसिह चव्हाण सर, समुपदेशक, ग्रामीण रुग्णालय मलकापूर हे लाभले. त्यांनी किशोर अवस्थेत मध्ये होणारे बदल, घ्यावयाची काळजी, व विद्यार्थिनींना शारीरिक स्वच्छतेची माहिती सांगताना, किशोर अवस्थेमध्ये मोबाईलचा होणारा अयोग्य वापर यावरती आपले प्रभावी असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी विद्यार्थिनींना शारीरिक आरोग्याचे महत्त्व, त्याचबरोबर मानसिक आरोग्य व सामाजिक आरोग्य कसे सुधारताना मोबाईलचा योग्य वापर कसा करावा यावरती प्रकाश टाकला.

त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मध्ये वाचन अभिरुची वाढविण्यासाठी मोबाईल व त्यास अनुसरून अन्य तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, मोबाईलचा वापर कशासाठी करावा व कशासाठी करू नये हे अनेक उदाहरणांच्या साह्याने स्पष्ट केले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या विज्ञान विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विज्ञान विभागाच्या समन्वयक प्रा.श्रीमती ए. बी. पवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती .एस . एस. लाळे मॅडम यांनी केले. सदर व्याख्यानासाठी व्यासपीठावर, प्रा श्रीमती ए बी पवार मॅडम, प्रा श्रीमती एस एस लाळे मॅडम, प्रा. श्रीमती .एस . ए . मुजावर मॅडम व इतर स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, व प्रशासकीय कर्मचारी श्री. संतोष पानकर, श्री.रोहित पाटील, श्री. सुनील पाटील, श्री. रणजीत पाटील यांचे सहकार्य लाभले, विद्यार्थिनी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या उपस्थित सदरचा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…