Home Uncategorized केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे – माणगाव येथे वह्या वाटप

केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे – माणगाव येथे वह्या वाटप

4 second read
0
0
52

मलकापूर प्रतिनिधी :

केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे -माणगाव येथे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार गुमास्ता या संघटनेचे उपाध्यक्ष व जनस्वराज्य पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद माने यांनी आज केंद्रीय प्राथमिक शाळा शिवारे माणगाव या शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी शेकडो वह्यांचे वाटप केले.

यावेळी या शाळेचे मुख्याध्यापक शंकर पांडुरंग मगदूम यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच यावेळी अरविंद माने ,पदवीधर अध्यापक संजय तळप ,रमेश डोंगरे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी अध्यापक सौ राजश्री पाटील ,सौ वर्षादेवी यादव, श्री सुनील नलगे, सौ प्रेमला मोहिते, श्री आनंदा सुतार ,श्री मोहन पाटील तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद चौगुले व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या स्वागत प्रास्ताविक संजय तळप (सर) यांनी केले तर आभार आनंद सुतार (सर) यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी : रोहित पास्ते मलकापूर येथील सुभाष रोड परिसरातील रहिवासी श्री. आनंदराव बंडू पाटी…