Home Uncategorized लालबावटा बांधकाम कामगार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी दि.५ रोजी कोल्हापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा…

लालबावटा बांधकाम कामगार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी दि.५ रोजी कोल्हापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा…

3 second read
0
0
117

विविध मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेकडून येत्या सोमवारी ता.५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापूर येथे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा राधानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी दिली. व संघटनेशी संबंधित सर्व बांधकाम कामगारानी या दिवशी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटना सिटू जिल्हा कमिटीच्या वतीने राज्यातील बांधकाम कामगारांना साहित्य नको पैसे दया या व अन्य मागण्यांसाठी या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जेवण नको पैसे दया, वस्तू नको पैसे दया, अवजारे खरेदी योजना चालू करा व कामगारांच्या खात्यांवर पाच हजार रुपये तात्काळ जमा करा आणि बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र मेडिकलेम योजना चालू करा, साठ वर्षांवरील कामगारांना महिना पाच हजार रुपये तात्काळ पेन्शन दया, बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला, व आँनलाईन सिस्टीम मधील व घरकुल मधील जाचक अटी रद्द करा या मागण्या तात्काळ मंजूर करा या व अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे असेही या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी कांबळे, भरत सुतार, अशोक सुतार, संदीप यादव, कृष्णात सुतार, मधूकर सुतार, संतोष कांबळे, जयवंत सुतार, आनंदा सुतार, संभाजी तापेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…