Home Uncategorized पृथ्वीराजसिंह यांच्या पुढाकाराने शिरोळमध्ये घर टु घर आरोग्य तपासणी

पृथ्वीराजसिंह यांच्या पुढाकाराने शिरोळमध्ये घर टु घर आरोग्य तपासणी

4 second read
0
0
64

      शिरोळ येथील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या पुढाकाराने शिरोळ नगरपरिषद, शिरोळ ग्रामीण रुग्णालय, घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरोळ उपकेंद्र शिरोळ, डॉ.जे.जे.मगदूम नर्सिंग कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी शिरोळ येथे कीटकजन्य आजाराबाबतीत जनजागृती,कंटेनर सर्वेक्षण,जलदताप, सीबीसी रक्ताची चाचणी व उपचार उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते धन्वंतरी मूर्तीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. शिरोळ शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून डेंग्यू, चिकुनगुनिया अशा साथीच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. याशिवाय शहरात पंचगंगा नदीच्या महापुराच्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरी आरोग्य धोक्यात येऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या कल्पकतेतून घर टू घर नागरी आरोग्य सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. 
      सर्वेक्षणामध्ये स्वयंसेवक, स्वयंसेविका, अशा वर्कर्स, डॉ.जे.जे.मगदूम नर्सिंग व आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शासकीय डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणामध्ये कीटकजन्य आजाराबाबतीत जनजागृती, कंटेनर सर्वेक्षण, सीबीसी रक्ताची तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय पावसाचे आणि पूरामुळे पाणी साचलेल्या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडणे, ऑईलचे बॉल टाकले जाणार असून यामुळे डेंग्यू डास नष्ट करण्याबरोबर उत्पत्तीचा बंदोबस्त होणार आहे. याशिवाय परिसरात स्वच्छता ठेवणे, धूर फवारणी व कीटकनाशक फवारणी करणे अशी कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहेत. 
       श्री दत्त साखर कारखान्याच्या दत्ताजीराव कदम सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षण शुभारंभ कार्यक्रमात मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रचंडराव युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, डॉ.नितीन डोणे,आरोग्य सेवक राजेश भांडवले, सहा. निसार अहमद झारी यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन करून नागरिकांनी उपक्रमास सहकार्य व प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. यावेळी शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे लॅब टेक्निशियन श्रीमती बोरडे, डॉ.जे.जे.मगदूम नर्सिंग व आयुर्वेदिक कॉलेजचे स्नेहल कुमार कांबळे व रफिया मुजावर विद्यार्थी-विद्यार्थिनी,देवेंद्र काशीद यांच्यासह आरोग्य कर्मचारी स्वयंसेवक, स्वयंसेविका, अशा वर्कर्स नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अशा सेविका गटप्रवर्तक सीमा पाटील यांनी केले, तर आभार वसुधा कुरणे यांनी मानले.

शिरोळ प्रतिनिधी : कुणाल कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…