Home Uncategorized भारतीय जनता पार्टीची शाहूवाडी तालुका कार्यकारिणी बैठक शासकीय विश्राम गृह शाहूवाडी येथे झाली

भारतीय जनता पार्टीची शाहूवाडी तालुका कार्यकारिणी बैठक शासकीय विश्राम गृह शाहूवाडी येथे झाली

9 second read
0
0
149

शाहूवाडी भाजपा पदाधिकारी कार्यकारिणी बैठक दि. 3/8/2022 रोजी शासकीय विश्रामगृह शाहूवाडी या ठिकाणी झाली. या बैठकीत प्रामुख्याने अनेक ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. आदरणीय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, त्या संबंधी शोक व्यक्त करण्यात आला.


हर घर तिरंगा
पक्ष विस्तारासाठी पक्षात नवीन येणारे कार्यकर्तेंना प्रवेश देणे,
तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकीच्या ईच्छुक उमेदवारांचा आढावा या आशयाचे विषय मांडण्यात आले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रत्येक मतदार संघात अनेक इच्छुकांनी आपली उमेदवारी पक्षाकडे मागितली.
या बैठकीसाठी शाहूवाडी तालुका- जिल्हा परिषद- पंचायत समिती प्रभारी माजी उपनगराध्यक्ष -प्रवीण प्रभावळकर, तालुका अध्यक्ष- विजय रेडेकर यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
तालुका सरचिटणीस- संजय खोत व विलास राऊत यांनी पक्षाचे अनेक विषय मांडले.
या बैठकीसाठी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष -प्रवीण प्रभावळकर, तालुका अध्यक्ष- विजय रेडेकर,
तालुका सरचिटणीस – संजय खोत, विलास राऊत, उदय कोकरे देसाई, भारत गांधी, युवा मोर्चा अध्यक्ष-संदीप पाटील, हरीभाऊ पाटील,डाॅ.संपत भोसले, बाळासो कारंडे, सर्जेराव कांबळे, रमेश चव्हाण, महीपती पाटील, कृष्ण दिंडे, महेंद्र दळवी, सचिन लाड, विनायक कदम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…