Home Uncategorized शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी…

शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलची बाजी…

2 second read
0
0
160

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारून विरोधी कारखाना बचाव पॅनेलला चारीमुंड्या चित केले. सत्ताधारी गटाने निर्विवाद बहुमत मिळवले. दतच्या ऊस उत्पादक सभासदांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. सहकार क्षेत्रातील मल्टीस्टेट असणाऱ्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती.

या दरम्यान बिगर ऊस उत्पादक व संस्था गटातील संचालकाच्या २ जागा आणि अ वर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती गटातील संचालकाची १ जागा अशा ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर संचालक मंडळातील अ वर्ग उत्पादक सभासद गटातील १६ जागेसाठी २२ उमेदवार आणि अ वर्ग उत्पादक महिला गटातील २ जागेसाठी ३ उमेदवार असे एकूण २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बुधवारी संचालक पदाच्या १८ जागेच्या निवडीसाठी कारखाना कार्यस्थळावर मतदान झाले होते. कारखान्याच्या २६७२६ सभासद मतदारांपैकी १६६०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यावेळी ६१.३७ टक्के मतदान झाले होते.

दरम्यान आज गुरुवारी मतमोजणी करण्यात आली. निकाल ऐकण्यासाठी गणपतराव पाटील आणि श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलमधील उमेदवारांचे कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन व पॅनल प्रमुख गणपतराव पाटील दत्त कॅन्टीनसमोर निकाल घोषित होईपर्यंत थांबून होते.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी ८ वाजता श्री दत्त कारखाना कार्यस्थळी मतमोजणीला सुरुवात झाली. ६७ टेबलांवरती मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सभासदांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…