Home Uncategorized कानसा खोऱ्यातील महिलांनी वारणेत साजरे केले रक्षाबंधन -आ. डॉ. विनय कोरे यांना बांधल्या राख्या

कानसा खोऱ्यातील महिलांनी वारणेत साजरे केले रक्षाबंधन -आ. डॉ. विनय कोरे यांना बांधल्या राख्या

4 second read
0
0
74


मलकापूर प्रतिनिधी :
शाहूवाडी तालुक्यातील विरळे गाव तसेच कानसाखोऱ्यातील महिलांनी दरमहा १५०० ची योजना सुरू केल्याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांना महिलांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
आमदार कोरे यांच्या वारणानगर येथील कार्यालयात महिलांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आनंदात साजरा केला. प्रनवी कृष्णा पाटील हिने या योजनेची माहिती दिली व आमदार कोरे यांचे आभार मानले. त्यानंतर आलेल्या सर्व महिलांनी राखी बांधली व महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी कोरे म्हणाले, सरकार आणि सामान्य माणूस यांचे थेट नातं बहीण-भावाच्या रूपाने जोडण्याचा एक अनोखा प्रयोग या योजनेच्या माध्यमातून संपन्न होत आहे. अनेक महिलांना बऱ्याच कारणांसाठी एक त्यागाची भूमिका घ्यावी लागते, आज त्यांना एक सन्मान, आनंद, आत्मविश्वास, नवबळ मिळवून देणारा असा हा एक ऐतिहासिक निर्णय झाला. ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत, पारदर्शक पद्धतीने पोहोचावी यासाठी मोठ्या स्तरावर यंत्रणा कार्यरत केलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात अगोदर शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यातील फॉर्म अपलोड होतील व महाराष्ट्रात सर्वात आधी काम पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी सरपंच कृष्णा पाटील,बयाजी पाटील,सुरेश निवृत्ती पाटील – जांबूर,विरळे गावच्या माजी सरपंच शारदा पाटील,थावडे गावच्या सरपंच शोभा मराठे,मनिषा दळवी – मालेवाडी,संगिता पाटील – जांबुर,छाया पाटील,ललिता पाटील,गितांजली पाटील – विरळे,सविता पाटील,उषा पाटील,माया तवरे,लक्ष्मी पाटील,आशा आसुळकर,उषा आसुळकर,रुपाली माजलेकर,कुसुम पाटील,जिजाबाई घोलप,मेघा गायकवाड,सुनंदा गायकवाड यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…