Home Uncategorized लाडक्या बहिणी राजेश क्षीरसागराना लाखांच्या फरकाने विजयी करतील – संजय मंडलिकदैवैज्ञ बोर्डिंग येथील मेळाव्यास उदंड प्रतिसाद

लाडक्या बहिणी राजेश क्षीरसागराना लाखांच्या फरकाने विजयी करतील – संजय मंडलिकदैवैज्ञ बोर्डिंग येथील मेळाव्यास उदंड प्रतिसाद

3 second read
0
0
56

कोल्हापूर,
महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केल्यानंतर महाराष्ट्रातील समस्त माता भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत. महायुती सरकारला मिळणारा पाठींबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघात लाडकी बहीण योजनेची तंतोतत अंमलबजावणी केली आहे. त्याचबरोबर भगिनी मंचच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी राजेश क्षीरसागरांना लाखांच्या फरकाने विजयी करतील असा विश्वास माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
दैवैज्ञ बोर्डिंग येथे उत्तर कोल्हापूर आणि दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमदेवार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजित उर्फ नाना कदम, राष्ट्रवादीचे आदिल फरार, बाबा पार्टे, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मंडलिक म्हणाले, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी शहरात भरीव कामगिरी केली आहे. आमदारकीच्या काळात तसेच राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून प्रचंड विकास निधी आणला. बहुतांश सर्व भागात समतोल विकास केला. यामुळे क्षीरसागर यांच्यासारख्या उमद्या नेत्याच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमहापौर देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावेळी ही योजना बंद करावी म्हणून विरोधक न्यायालयात गेले. तसेच ही योजना फसवी असून सरकार काहीही देणार नाही अशा अफवा त्यांनी पसरवल्या. मात्र सरकारने सलग 5 महिने माता भगिनींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये वर्ग केले. तळागाळातील सर्वसामान्य महिलांना याचा मोठा फायदा झाला. यामुळे राज्यातील भगिनींचा सरकारला मिळणारा पाठींबा वाढला. यामुळे विरोधक बिथरले आणि बेताल वक्तव्य करत असल्याचे मंडलिक म्हणाले.
राजेश क्षीरसागर धडाडीचे नेते आहेत. आपल्या लोकांसाठी सरकारकडून कसा निधी आणायचा यात त्यांचा हातखंडा आहे. यासाठी शहरवासियांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आणि त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, या मेळाव्याला नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…