Home Kolhapur मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार,औद्योगिक संघटनांचा निर्णय

मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार,औद्योगिक संघटनांचा निर्णय

3 second read
0
0
705

१९ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीत मतदारांना या दिवशी मतदान करता यावे म्हणून सात मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहेत. औद्योगिक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदार संघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. त्यांना मतदान करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप चौगले, कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे उपस्थित होते. यावेळी मतदानादिवशीऔद्योगिक कारखाने, आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आणि याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. दरम्यान मतदाना दिवशी सुट्टी म्हणून सर्व औद्योगिक संघटनांनी सोमवारी ६ मे २०२४ या साप्ताहिक सुट्टी दिवशी कामकाज सुरू ठेवून मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी सुट्टी देण्याचे सर्वानुमते ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…