Home राजकारण विशाल पाटलांचा अपक्ष अर्ज, सांगलीत ठाकरेंना डोकेदुखी

विशाल पाटलांचा अपक्ष अर्ज, सांगलीत ठाकरेंना डोकेदुखी

6 second read
0
0
466

१७ एप्रिल २०२४

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच्या वाट्याला न आल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आता पाटील यांनी मंगळवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत शक्तिप्रदर्शन करीत ते अपक्ष म्हणून अतिरिक्त अर्ज दाखल करणार आहेत. विशाल पाटील यांच्या बंडाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.

xr:d:DAF_Fpdiazk:3,j:4632373425486047223,t:24031006

जागावाटपामध्ये सांगली लोकसभेची जागा मिळावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी फारच आग्रह धरला होता. सांगली जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी त्यासाठी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्याने काँग्रेसला सांगलीच्या जागेवर पाणी सोडावे लागले.

शिवसेना ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत. विशाल पाटील निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले तर सांगलीत तिरंगी लढत होईल.

काँग्रेसच्या विशाल पाटील यांना मागच्या लोकसभा निवडणुकीत ३ लाख ४४ हजार मते मिळाली होती. भाजपचे संजयकाका पाटील यांना पाटील यांनी कडवी झुंज दिली होती. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाविरोधात महाविकास आघाडीतील विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरे गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरली आहे

काँग्रेसची मते जर पाटील यांच्या मागे गेली तर मग ठाकरे गटाच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच या मतदारसंघातील विजयाचे गणितही मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. बंडखोरी होऊन होणाऱ्या मतविभाजनाचा भाजपच्या उमेदवाराला निश्चितच फायदा मिळणार आहे. त्यामुळे आता विशाल पाटील यांना माघार घ्यायला काँग्रेस राजी करते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…