Home राजकारण आजीच्या अनुभवावरून नातू विशाल पाटील यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला ; आजीचं नातू ऐकणार का ?

आजीच्या अनुभवावरून नातू विशाल पाटील यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला ; आजीचं नातू ऐकणार का ?

2 second read
0
0
648

दि १३ एप्रिल २०२४

काँग्रेस टिकवायला काँग्रेस लहान मुल नाही त्यांना मी जेष्ठतेच्या नात्याने सल्ला देते. पाच वर्षाअगोदर तयारी करावी लागते, कोणाचे तरी नातेवाईक असून उपयोग नाही. ऑफिसमध्ये बसून काहीही होत नाही. काम करा, मग तिकीट मिळवा. अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही”, अशा शब्दांत शालिनीताई पाटील यांनी आपल्या नातवाची कानउघडणी केली आहे.

सांगली लोकसभा जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद बघायला मिळत आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीत सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यास मान्य केलं आहे. पण असं असलं तरी सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसची बालेकिल्ला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी, अशी मागणी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देणं हे आपल्या पचनी पडलेलं नाही, असं उघड वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे विशाल पाटील हे आता अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या तयारीत असल्याचीदेखील चर्चा आहे.

या सर्व घडामोडींवर वसंत दादा पाटील यांच्या पत्नी आणि विशाल पाटील यांच्या आजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्याच नातवाचे कान टोचले आहेत. स्वतःच्या अनुभवावरून नातू विशाल पाटील यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. पण आता नातू आपल्या आजीचं ऐकणार का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…