Home राजकारण माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी पण…, चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगलीत खळबळ

माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी पण…, चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने सांगलीत खळबळ

2 second read
0
0
1,582

दि १६ एप्रिल २०२४

“माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर, माझी उमेदवारी मागे घेण्याची तयारी आहे. फक्त शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको हे काँग्रेसने उघडपणे येऊन सांगावे. मान्य आहे माझ्याकडे कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत”, असे ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले. सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

चंद्रहार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचा मुलगा खासदार होतोय हे दुखणे आहे की शिवसेनेचा खासदार होणार आहे हे दुखणे आहे हे मला कळेना. हे सर्व पाहून माझ्या मनाला खूप वेदना होतात. महाराष्ट्रातील मी एकमेव उमेदवार असेन ज्याची उमेदवारी चार वेळा जाहीर होऊनही मविआ मधील काही घटक पक्ष अजूनही आमच्या पासून लांब आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…