Home Uncategorized ओलवन येथे ऋषिकेश होमस्टे रिसॉर्टमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर राधानगरी पोलिसांचा छापा.. ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ओलवन येथे ऋषिकेश होमस्टे रिसॉर्टमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर राधानगरी पोलिसांचा छापा.. ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

2 second read
0
0
229
   राधानगरी तालुक्यातील ओलवन येथील ऋषिकेश होम स्टे होममध्ये सुरू असणाऱ्या जुगारअड्ड्यावर छापा टाकत राधानगरी पोलिसांनी सुमारे ११ लाख सात हजार सातशे ऐशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सतरा आरोपींवर मुंबई जुगार कायद्यानुसार  गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी मालवण कणकवली फोंडा यासह् कोकण विभागातील आहेत.


      याबाबत अधिक माहिती अशी की ,राधानगरी अभयारण्यातील  दाजीपूर वनाशेजारी ओलवण गावच्या हद्दीत विलास तुकाराम पाटील यांच्या मालकीचे ऋषिकेश होम स्टे आहे. या होमस्टे मध्ये कोकणातुन येउन येथे जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे ,सापळा रचून तपासाच्या उद्देशाने एक पथक तयार करून तेथे पाठवले असता  ओलवण दाजीपूर येथील ऋषिकेश विलास पाटील याने ऋषिकेश होम स्टे रिसॉर्टमध्ये महेश जोशी मालवण,महेश गांधी कणकवली,शरद गुरव खारेपाटण, दत्ता वाघमारे कणकवली,किशोर सावंत फोंडा घाट,अनिल सिलकर कणकवली,संदीप राणे,जयवंत बाईत, निलेश हेरेकर सिंधुदुर्ग, रामचंद्र धुरसोळे, सुधीर गांधी खारेपाटण, दिनेश जैतापकर राजापूर, अलपेश गांधी,प्रकाश साळवी फोंडा, विशाल मोहिते मालवण,विनायक शिर्के,मिलिंद कुबडे फोंडा यांना फोंडा कणकवली या कोकण भागातून बोलावून घेऊन  ऋषिकेश पाटील याने स्वतःच्या फायद्याकरिता रम्मी खेळावर पैसे लावून रम्मी नावाचा जुगार खेळत असताना राधानगरी पोलिसांनी रंगेहात पकडून एक लाख सदतीस हजार दोनशे ऐशी रुपयांची रोख रक्कम,पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचे  सहा मोबाईल,अल्टो कार, तवेरा, वॅगनार,एस क्रॉस आशा चार चाकी नऊ लाख पंचवीस हजार किमतीच्या  चार गाड्या असा ११ लाख ७ हजार सातशे ऐशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या पथकामध्ये पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलीस उपनिरीक्षक एन ए खान पोहेकॉ  बी डी पाटील के डी लोकरे सचिन पारखे विक्रम तावडे रोहित खाडे योसेफ गावीत हे होते , या पथकाने कारवाई , करत होम स्टे मालकासह कोकणातील १७ अशा १८ जणांच्या वर कारवाई केली आहे

कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

राधानगरी प्रतिनिधी/ मिलिंद कांबळे राधानगरी : येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंती मोठ्या उत्…