Home Uncategorized राधानगरी पोलिसांकडून पाच लाखांच्या सोने चोरीचा छडा..

राधानगरी पोलिसांकडून पाच लाखांच्या सोने चोरीचा छडा..

3 second read
0
0
1,128

राशीवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड

दिनांक 17/2/2024 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी ४ च्या दरम्यान मोहन कृष्णात पाटील राहणार गवशी पैकी पाटील वाडी यांच्या राहत्या घरातून अज्ञाताने सोन्याचे चीताक, लक्ष्मी हार, गंठण, नेकलेस, कर्नवेल जोड आणि सोन्याची अंगठी असा एकूण ५ लाख 31 हजार 375 रुपयांचा सोनेमुद्देमालाची चोरी झाली होती. दिलेल्या फिर्यादनुसार तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केलेला मुद्देमाल कळे येथील माऊली ज्वेलर्स चे सोनार आप्पासो माने यांना विकल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून सोनार आप्पासो माने यास वाकरे फाटा येथे ताब्यात घेतले. सदर अल्पवयीन बालकांकडून सोने घेतल्याची कबूल दिली असून त्यांच्याकडील चोरीचा पूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी आरोपी सोनार आप्पासो माने यास कोर्टामध्ये हजर केलेले आहे. या कामगिरीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी सदरची कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…