Home Uncategorized बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या गजरात जळ यात्रेतील पहिला दिवशीचा पालखी सोहळा अखंड उत्साहात संपन्न झाला..

बिरदेवाच्या नावानं चांगभलं च्या गजरात जळ यात्रेतील पहिला दिवशीचा पालखी सोहळा अखंड उत्साहात संपन्न झाला..

4 second read
0
0
176

गुरु शिष्याच्या गळाभेटी सोहळ्यानंतर पहाटे पालखी मुख्य मंदिरात आल्यानंतर श्रींना गादीवर बसण्यात आले. यावेळी देवस्थानचे देवऋषी बिरू पुजारी यांची गादीवरील भाकणूक झाली त्यानंतर नारायण राणे यांना मांडीवरील बकरी कापण्याचा तर आकाराम पुजारी यांना बकरी धरण्याचा मान मिळाला या सोहळ्यानंतर भाविक भक्तांनी आंबील वडी भाकरीचा नैवेद्य सर्वांना वाटण्यात आला. दुपारी श्रींना पालखीमध्ये बसवून पालखीवर वसंत पुजारी यांनी नवसाची मुले उधळली आणि यानंतर ढोलकैताळाच्या निनादात भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत बिरदेवाच्या नावानं चांगभलं अशा घोषणा देत पालखी सदरेवर आली. यावेळी मानकरी स्वप्निल बनकर यांच्यासह बनकर बांधवांनी हेडाम खेळले आणि सर्व विश्वाचे पुढील बारा वर्षांचे भविष्य सांगणारे देवरुशी गणपती पुजारी गडमुडशिंगी आणि वाशीचे भागोजी रानगे यांच्या जोडीची भाकणूक संपन्न झाली . भाकणूक ऐकण्यासाठी भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. रात्री नऊ वाजता सबीना लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरात परत आला. यावेळी महाराष्ट्र सह परराज्यातून आलेल्या नामवंत शाहिरांचा धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी उपाध्यक्ष रंगराव राणगे देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य लोकनियुक्त सरपंच शिवाजी जाधव मिठारी उपसरपंच जयसिंग पाटील यांच्याबरोबरच सर्व ग्रामपंचायत सदस्य धनगर समाज बांधव यात्रेचे सर्व मानकरी आणि विविध भागातून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kk न्यूज साठी कृष्णा लाड राशिवडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…