Home Uncategorized ….तोपर्यंत शिरोळ पालिकेला घरफाळा पाणीपट्टी एकही रुपया भरला जाणार नाही : पृथ्वीराजसिंह यादव

….तोपर्यंत शिरोळ पालिकेला घरफाळा पाणीपट्टी एकही रुपया भरला जाणार नाही : पृथ्वीराजसिंह यादव

3 second read
0
0
66

शिरोळ : प्रतिनिधी


लेखा परीक्षकांच्या अहवालानुसार सन २०२०/ २१ मध्ये घरफाळा पाणीपट्टी करामध्ये निर्माण झालेली २९ लाख ९९ हजार रुपयांची तफावत वसूल होत नाही, भ्रष्टाचार करणाऱ्या वर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिरोळ नगरपरिषदेला घरफाळा पाणीपट्टी रूपाने एकही रुपया भरला जाणार नाही. आणि नगर परिषदेने जबरदस्तीने वसुली करण्याचा प्रयत्न करू नये, केल्यास तो हाणून पाडू असा इशारा युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिला व त्यास शिरोळ मधील समस्त नागरिकांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे.
शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्तमध्ये नगरपरिषदेकडील विकास आराखड्यामध्ये खाजगी मालकी हक्काच्या शेतजमिनी व जागेवर टाकलेले आरक्षण, घरफाळा, पाणीपट्टी करावर लावले जाणारे दंड, व्याज, मिळकत धारकांना न्यायालयात खेचून त्यांच्यावर केलेला अन्याय, लेखा परीक्षकांच्या अहवालानुसार घरफाळा पाणीपट्टी मध्ये समोर आलेली तफावत, मिळकत धारकांच्या मानगुटीवर बसवलेला दुहेरी कर, विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणि नव्याने होत असलेली पाणीपुरवठा योजना या अनुषंगाने नागरिकांची बैठक बोलावण्यात आली होती. युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे होते. पृथ्वीराजसिंह यादव यांनी नगरपरिषदेमध्ये मागील पाच वर्षात झालेल्या कामकाजातील खाजगी जमिनीवरील आरक्षण, पाणीपुरवठा घरफाळा पाणीपट्टी दंड व्याज दुहेरीकराचा आढावा घेतला. त्यानंतर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. बैठकीतील सर्वसमावेशक निर्णयानुसार मुख्याधिकारी यांना जाब विचारण्याचे ठरले. बैठकीला धनाजी पाटील नरदेकर, पंडित काळे, गजानन संकपाळ, विजय आरगे यासह पीडित नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…