Home Uncategorized पेठवडगांव येथे दुय्यम निबंधक कार्यालय मंजूरखा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

पेठवडगांव येथे दुय्यम निबंधक कार्यालय मंजूरखा.धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

6 second read
0
0
374

पेठवडगांव / प्रतिनिधी :
विस्ताराने मोठा म्हणजे अडीच ब्लॉकचा असलेल्या हातकणंगले तालुक्यातील नागरीकांच्या सोयीसाठी पेठवडगांव येथे नव्याने दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील 20 गावांना चांगली सुविधा उपलब्ध झाली असून लवकरच येथून दस्त नोंदणी सुरु होणार आहे. यासाठी खा.धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला होता.
तालुक्यात सध्या इचलकरंजी येथे दोन, तर हातकणंगले येथे एक अशी तीन दुय्यम निबंधक कार्यालये सुरु आहेत. दैनंदिन उलाढाल आणि व्याप मोठा असल्याने दस्त नोंदणीसाठी या कार्यालयावर अतिरिक्त तान पडत होता. विशेष करुन हातकणंगले कार्यालयात दस्त नोंदणीसाठी 4 ते 5 दिवस वेटींगवर रहावे लागत होते. ही तिन्ही कार्यालये तालुक्याच्या एकाच टोकला असल्यामुळे पेठवडगांव परिसरातील 20 गावातील नागरीकांची कुचंबना होत होती. यामुळे नागरीकांना नाहक त्रास तर होत होताच आणि वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंडही बसत होता. त्यामुळे पेठवडगांव परिसरात स्वतंत्र कार्यालय व्हावे, अशी मागणी होत होती. या संदर्भात परिसरातील दस्त लेखनिक आणि काही नागरीकांनी खा.धैर्यशील माने यांना साकडे घातले होते. त्यानंतर खा.माने यांनी तातडीने पत्रव्यवहार केला. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला. याला मंगळवारी यश आले. या संदर्भात शासनाने तातडीने शासन आदेश काढले. त्यामुळे पेठवडगांव परिसरातील शेतकरी, नागरीक आणि दस्तलेखनिक यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
दुय्यम निबंधक श्रेणी 1 या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गावांचे विभाजन न करता दुय्यम निबंधक श्रेणी 1 हातकणंगले व पेठवडगांव या कार्यालयाचे कार्यक्षेत्र एकच ठेवून पेठवडगांव येथे नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पेठवडगांव येथील कार्यालयाकरीता सोयीची जागा उपलब्ध करुन आवश्यक यंत्रसामुग्री व इमारत बांधकाम करुन कार्यालय स्वतंत्रपणे सुरु करण्याचे आदेश राज्याचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांच्या सहीने आदेश काढले.
विशेष म्हणजे हातकणंगले आणि पेठवडगांव या दोन कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या गावांचे विभाजन होणार नाही. त्यामुळे या गावातील नागरीकांना सोयीच्या ठिकाणी म्हणजेच पेठवडगांव, अगर हातकणंगले येथे दोन्ही ठिकाणी दस्त नोंदणी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्…