Home Uncategorized कोल्हापूरची उमेदवारी कोणाला जाणार?? याची स्पष्टता समोर..

कोल्हापूरची उमेदवारी कोणाला जाणार?? याची स्पष्टता समोर..

2 second read
0
1
1,587

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळेल?? याचा संभ्रम सर्वांच्याच मनात उत्पन्न झाला होता; मात्र आता त्यावर उत्तर मिळाले आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोल्हापूर मतदार संघ छत्रपती शाहू महाराजांना सोडण्यास सहमती दर्शवली आहे.

अर्थात महाविकास आघाडी करून कोल्हापूरसाठी शाहू महाराज मैदानात उतरणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. या जागेच्या बदलात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झाले.

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नाराजी उत्पन्न झाल्याचे संकेत दिसून येत आहेत. दिल्लीतील पक्ष नेतृत्वासोबत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यावर एकमत झाल्याचे कळते, कोल्हापूरच्या बदलात सांगली मतदारसंघ द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केले असून यावर बुधवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाने सांगलीची जागा जर घेतली तर कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब न झाल्याने पुढील राजकीय वर्तुळे कशी बदलणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…