
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी जवळजवळ शाहू महाराजांचे नाव निश्चितच झाल्याचे चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात एकमत झाल्याने ही जागा काँग्रेसला दिल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी दिली जाईल, याची शक्यता नाकारता येत नाही.
शरद पवार व काँग्रेस नेत्यांकडूनही या नावाला सहमती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला उमेदवारी दिली तर, त्यासाठी देखील योग्य नाव शाहू महाराजांचे आहे, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.
या सर्वांवर उद्या निर्णय होणे अपेक्षित आहे. शाहू महाराजांनी आपल्याला ‘ऑफर’ आल्याचे जाहीर केल्यानंतर मतदारसंघाची राजकीय वर्तुळे बदलली आहेत. यातून कोल्हापूरची जागा काँग्रेसला जाण्याची अधिक शक्यता दिसून येते.
दरम्यान सध्या राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रभावशील उमेदवार नसल्याने कोल्हापूरची उमेदवारी नेमकी कोणाला मिळते या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले आहे.


