Home Uncategorized हातकणंगले लोकसभा मतदार संघात पुन्हा मानेंविरुद्ध शेट्टींची लढत होण्याची शक्यता अधिक…

हातकणंगले लोकसभा मतदार संघात पुन्हा मानेंविरुद्ध शेट्टींची लढत होण्याची शक्यता अधिक…

3 second read
0
0
751

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. चिन्ह व पक्ष कोणतेही असले तरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्याचे खासदार धैर्यशील माने यांच्याविरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये लढत होण्याची शक्यता अधिक दिसून येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता सर्वच आजी माजी नेत्यांची जोरदार तयारी सुरू आहे.

दरम्यान अद्यापही राजू शेट्टी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील याची स्पष्टता दिसून आली नसल्याने शेट्टी यांचा पक्ष व चिन्ह यावर संभ्रम आहे ; परंतु हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक दिसून येते. या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा व भाजपचा एकही आमदार नाही. सध्या तरी शेट्टी यांच्या उमेदवारी मुख्यतः शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे त्यामुळे राजू शेट्टी हे कोणाकडून निवडणूक लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजू शेट्टी हे स्वतंत्र लढत देतील, याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तर दुसरीकडे या मतदार संघातून राहुल आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे. एकंदरीत सध्यातरी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खा. धैर्यशील माने यांच्या विरुद्ध माजी खा. राजू शेट्टी यांची लढत होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…