Home Uncategorized कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव व उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची निवड…

कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव व उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची निवड…

5 second read
0
0
100

कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी राजन भारत सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपिक व्ही. एम. तोडकर होते.

कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२३-२४ ते २०२४-२०२५ या सालाकरीता पदाधिकारी निवडी आज झाल्या. यावेळी अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव तर उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे संचालक चंद्रकात चोरगे, हिंदुराव कामते, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अशोक जाधव, भरत जाधव, माणिक सातवेकर, सुधाकर सुतार, संगीता नलवडे आदी उपस्थित होते.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांचे काम यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे संस्थेचे काम अधिक चांगले करण्याची जबाबदारी माझी आहे. संस्थेच्या संभापूर औद्योगिक वसाहतमधील विजेचा प्रश्न मी सोडवला आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणी आणि शहरात आयटी पार्क डेव्हलपमेंट साठी मी कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि क्रिकेट या खेळातील एक ज…