Home Uncategorized शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा

शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा

4 second read
0
0
179

शिरोळ : प्रतिनिधी
येथील शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच व पत्रकार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ दगडू श्रीपती माने ( पत्रकार ) यांचा विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमास उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी डॉ दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त निमशिरगांव येथील आई वृद्धाश्रम संस्थेमधील मातांना साडी चोळी भेट देण्यात आली. वृद्धाश्रमातील मातांनी औक्षण करून शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांना आशीर्वाद दिला. आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांच्या हस्ते डॉ माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र प्रधान, रावसाहेब भोसले, सचिन कमलाकर , प्रा गंगाराम सातपुते ,गजानन कदम सर , सचिन तोडकर ,श्रीमती कमल तोडकर , तेजस तोडकर , सुभाष माने , श्रेयस माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिरोळ येथील राजर्षी शाहू वाचन मंदिर संस्थेस श्रीमती फुलाबाई माने यांच्या हस्ते पुस्तकासाठी ५ हजार रुपयांचा निधी वाचनालय पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष एम एस माने, कार्यवाह धनाजीराव जाधव, लोकल ऑडिटर विजयसिंह माने -देशमुख, संचालक डॉ आप्पासाहेब पुजारी, रामचंद्र पाटील, एन. वाय जाधव, अशोक गंगधर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर डॉ दगडू माने व पत्नी संगीता माने यांनी आईसाहेब फुलाबाई माने यांचे पाद्य पूजन करून आशीर्वाद घेतले.

वाढदिवसाच्या निमित्ताने नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर, दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील ,आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने, भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद माने, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे , माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील , माजी सरपंच गजानन संकपाळ , जयसिंगपूरचे उद्योगपती अशोकराव कोळेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय पवार ,डी आर पाटील, चंद्रकांत भाट , सर्जेराव कांबळे , शंकर बिराजदार, विनोद माने,दिगंबर सकट , अनिल लोंढे , खंडेराव हेरवाडे , संतोष बिरणगे, दिलीप शिरढोणे, मदन गावडे , संतोष तारळे , सुरेश कांबळे ,अविनाश सूर्यवंशी , कुणाल कांबळे, विश्वास कांबळे , दिपक महानाम, राजेंद्र प्रधान ,शशिकांत चव्हाण , पी वाय कुंभार शिवाजी पाटील – कौलवकर , विठ्ठल देवकारे ,भरत कार्वेकर ,फिरोज मुजावर ,संदीप माने पेंटर , दिलीप उर्फ दिवाण कोळी अर्जुन धुमाळ , सचिन सूर्यवंशी ,सयद पिरजादे , सुधाकर तावदारे ,नारायण लोंखडे ,प्रदिप आयगोळे ,के एम भोसले यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह दिव्यांग संघटना पदाधिकाऱ्यांनी डॉ दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान ,वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हिंदी मराठी गीतांच्या मैफिल कार्यक्रमात सारेगमप लिटल चॅम्पस कु दिव्या मगदूम , अभिनेता रावसाहेब भोसले, राजेंद्र प्रधान व हास्यसम्राट फेम विनोदी कलाकार भरत पाटील आदि कलाकारांनी कराओके गीत कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दिवाण कोळी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…