Home Uncategorized मलकापूर नगर परिषद कर्मचारी यांची पदोन्नती

मलकापूर नगर परिषद कर्मचारी यांची पदोन्नती

2 second read
0
0
506

मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर नगरपरिषद आस्थापनेवरील मंजूर वरिष्ठ लिपिक ०२ पदे व लिपिक ०१ पद. या पदाच्या पदोन्नतीचा प्रस्ताव मा. जिल्ला पदोन्नती समिती, नगरपालिका प्रशासन कोल्हापूर यांचेकडे मलकापूर नगरपरिषदेने पाठविला होता. सदर प्रस्तावानुसार मलकापूर नगरपरिषद कर्मचारी लिपिक महेश भावखडकर व प्रसाद हर्डीकर यांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली.

तसेच फायरमन अमर पाटील यांना लिपिक या पदावर पदोन्नती मिळाली आहे.सदर पदोन्नतीचे आदेश मा. सह आयुक्तसो नगपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले असून सदर पदोन्नतीसाठी मुख्याधिकारी विद्या कदम यांच्यामार्गदर्शनाखाली कर व प्रशासकीय अधिकारी ऋषिकेश पाटणकर यांनी विशेष प्रयत्न केले. पदोन्नतीसाठी पात्र कर्मचारी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. बऱ्याच वर्षापासून रिक्त असणाऱ्या वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नतील नेमणूक झाल्याने कर्मचारी वर्गामधून मुख्याधिकारी याचे विशेष अभिनंदन होत आहे.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…