Home Uncategorized आमदार प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नांना यश; मतदार संघातील ग्रामपंचायतीतील पूर्ण होणार ‘ही’ कामे…

आमदार प्रकाश आबिटकरांच्या प्रयत्नांना यश; मतदार संघातील ग्रामपंचायतीतील पूर्ण होणार ‘ही’ कामे…

4 second read
0
0
614

राधानगरी विधानसभा मतदार संघातील अनेक ग्रामपंचायतींना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून विकास कामांच्या पूर्ततेसाठी निधी मंजूर झाला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघ संघ हा दुर्गम समजला जातो. येथील अनेक ग्रामपंचायतीच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इमारतींची दुरुस्ती व नवीन बांधकाम करून देण्याची मागणी अनेक वर्षापासून होती.

ही बाब लक्षात घेऊन आमदार आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून राधानगरी-गारगोटी मतदार संघातील 37 ग्रामपंचायतींना नवीन इमारत मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राज्य सरकारच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला आहे. 37 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 07 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधी अंतर्गत जिथे ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालय इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालय इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने हा निधी दिला आहे.

राधानगरी लोकसभा मतदारसंघात विकास कामे यशस्वीरित्या पूर्ण व्हावी, यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी विशेष प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलेले आहे. ग्रामविकास विभागाने 26 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार 37 ग्रामपंचायतीतील कामांना मंजुरी दिली आहे.

या कार्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

शिरोळ : प्रतिनिधी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्…