Home क्राईम राधानगरी मुख्य बाजरपेठेत तीन ठिकाणी चोरी, घटनेने भीतीचे वातावरण

राधानगरी मुख्य बाजरपेठेत तीन ठिकाणी चोरी, घटनेने भीतीचे वातावरण

4 second read
0
0
2,120

राधानगरी/प्रतिनिधी, मिलिंद कांबळे:

राधानगरी शहरात मुख्य बाजारपेठेत दोन दुकाने आणि एक बंद घर अशा तीन ठिकाणी एकाच रात्री चोरी झाली आहे. तर एका दुकानांचे चोरट्यानी दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला असून तो अयशस्वी ठरला. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला असून ,बंद घराचा दरवाजा तोडून तर दुकानांचे कुलपे तोडून चोरट्यानी चोरी केली आहे. निपाणी देवगड राज्यमार्गावर राधानगरी माने चौकात चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी मध्यरात्री हा धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे. राधानगरी इथल्या मुख्य रस्त्याच्या गटारींचे काम सुरू असल्याने स्ट्रीट लाईट बंद आहेत. अंधाराचा फायदा घेत चोरट्यानी मुख्य चौकात चोरीचा धाडसी प्रयत्न केला. राकेश दत्तात्रय निल्लेहे कोल्हापूर येथे वास्तवास आहेत. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून, दोन तिजोऱ्या फोडून सोन्याच्या लहान अंगठ्या व चांदीची नाणी असा ऐवज लंपास केला. अमोल आडके यांच्या मालकीच्या हार्डवेअर दुकानाचे कुलुप तोडून पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम आणि या जवळ असलेले भरत बोंबाडे किराणा दुकानातील सहा हजारांची रोखड चोरट्यानी लांबवली. तर स्टेशनरी दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन. ए. खान, प्रवीण गुरव यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्त्याचे रूप पालटणार, डांबरीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर ; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर शहरातील देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. ज…