Home Uncategorized जीवनावश्यक वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याबद्दल निवेदन देताना मलकापूर व्यापारी असोसिएशन

जीवनावश्यक वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याबद्दल निवेदन देताना मलकापूर व्यापारी असोसिएशन

3 second read
0
0
60

अन्नधान्य, खाद्यअन्न वस्तूवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल मध्ये घेतला आहे. सदर बाबतचे नोटिफिकेशन दिनांक 13 जुलै 2022 रोजी काढले असून दिनांक 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यअन्य व जीवनावश्यक वस्तूवर 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा परिणाम आपल्या व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे.

त्यामध्ये अन्नधान्य गुळ कडधान्य या वस्तूंचा समावेश केला असून याबाबत भारतातील प्रमुख संघट संघटनेनी देशव्यापी बंद पुकारला आहे.तरी सदर बंदला मलकापूर व्यापारी असोसिएशनचा पूर्णपणे पाठिंबा असून त्यासाठी दिनांक 16 जुलै 2022 संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून सदर निर्णयाबाबतचा निषेध जाहीर केला आहे. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र मोरे यांना निवेदन देताना महेश कोठावळे ,स्वरूप गांधी ,चेतन गुजर ,फारुक भटारी, रोहित पास्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…