Home Uncategorized दालन २०२४ ला मिळतोय उत्तम प्रतिसाद…

दालन २०२४ ला मिळतोय उत्तम प्रतिसाद…

2 second read
0
0
128

बांधकाम विषयक साहित्य, तंत्रज्ञानासह नामांकित प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी कोल्हापूरकर ‘क्रीडाई कोल्हापूर’ ने आयोजित केलेल्या दालन प्रदर्शनाकडे येत आहेत.शनिवारी ४.०० वा झालेल्या सत्रात यशोधन कॉन्स्ट्रो याची सी यु सुधीर म्हणजे आणि संस्थापक नंदकुमार जाधव यांनी परिसंवादातून सिव्हील व आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना मार्गदर्शन केले.

प्रास्तविक्रीचे अध्यक्ष के पी खोत यांनी केले. सुधीर म्हणजे यांनी बांधकाम कचऱ्याच्या पुनर्वापराचे महत्व विशद केले. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षाकाठी एक लाख दहा हजार टन बांधकाम कचरा निर्माण होतो. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड संशोधनातून या कचऱ्यातील 40 टक्के भाग पुन्हा वापरात येत असल्याचे सिद्ध केले आहे. तसेच एक किलो सिमेंट निर्मितीतून एक किलो कार्बन हवेत सोडला जात असल्याने भविष्यात याचा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. दीप थिरोटेक चे संस्थापक नंदकुमार जाधव यांनी फेरो सिमेंट पद्धतीने आरसीसी बांधकामांना पर्यायी बांधकामाची माहिती दिली , बांधकामाच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार दिसणाऱ्या फरकाची माहिती दिली.

यावेळी क्रीडाई उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार ,सचिव संदीप मिरजकर, खजिनदार अजय डोईजड, दालन चेअरमन चेतन वसा, प्रमोद साळुंखे ,अतुल पवार , गणेश सावंत, श्रीधर कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आभार प्रदर्शन श्री.अमोल देशपांडे यांनी केलेआज रविवारी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थिती लावणार आहे. स्त्री शक्ती आणि आयुर्वेदाची महती या विषयावर

परिसंवाद साधण्यासाठी आयुर्वेदाचार्य वैद्य सविनय विनायक दामले हेही सायंकाळी चार वाजता येत आहेत. या परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी माननीय आमदार श्रीमती जयश्री जाधव, माननीय मधुरीमाराजे छत्रपती व माननीय जयश्री देसाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती असणार आहे.महासैनिक दरबार लॉन्स येथे सुरू असलेल्या ‘दालन ‘ या क्रीडाई कोल्हापूर तर्फे आयोजित प्रदर्शन सुरू आहे .

शनिवारी प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व स्टॉलवर गर्दी दिसून आली. या प्रदर्शनात केवळ बांधकाम साहित्याची नावे ते रिकामे प्लॉट तयार रो बंगलो यांची माहिती सुरत गृह कर्ज गृह सजावटीसाठी लागणारे साहित्य याची माहिती देण्यात येत आहे त्यामुळे केळगाव असायची नव्हे तर अनेकांनी सहकुटुंब प्रदर्शनात उपस्थिती लावली बँक प्रतिनिधींकडून ग्रह कर्जाची माहिती जागेवरच मिळत असल्याने अनेकांनी उपलब्ध या ठिकाणी बुकिंग केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…