
अर्थव्यवस्थेला गती देण्यासह विकास, रोजगार वाढविण्यात बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करून बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावले जातील असे असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
‘क्रिडाई’च्या मागण्यांना कोल्हापुरातील सर्व पक्षांचे समर्थन आहे. विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा कोल्हापूरचा गुण राज्यासाठी आदर्शवत असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले,येथील महासैनिक दरबार लॉन्समध्ये क्रिडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘दालन’ या बांधकामविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख उपस्थित होते. ‘दालन’ प्रदर्शनाचा शानदार वातावरणात प्रारंभ झाला.
या उद्घाटन प्रसंगी मंत्री उदय सामंत म्हणाले क्रीडायने मांडलेले प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे नगर विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्या समवेत लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी बैठक घेतली जाईल. हे अश्रू केवळ आश्वासन नाही तर वचन आहे. कोल्हापूर क्रिडाई प्रथम क्रमांकावर आहे, येथील बांधकाम व्यवसायिकांनी ग्रह स्वप्न साकारणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात. मुख्यमंत्र्यांसह आमचे सरकार संवेदनशीलपणे काम करते. त्यामुळे तुम्हाला काही कमी पडणार नाही.

“कोल्हापूरचे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘आम्ही दोघे नगरविकास राज्यमंत्री राहिल्याने बांधकाम क्षेत्राचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत. ते निश्चितपणे आचारसंहितेपूर्वी सोडविले जातील. ‘क्रिडाई’ बांधकाम व्यावसायिकांचे चांगले संघटन असून ‘दालन’ प्रदर्शनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. बांधकाम क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आदी पायाभूत सुविधा भक्कम केल्या जात आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला एक हजार कोटींचा निधी दिला जाईल. शेंडापार्कातील ११०० बेडच्या अद्यावत हॉस्पिटलच्या कामाची 700 कोटींची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच भूमिपूजन केले जाईल.
आमदार सतीश पाटील म्हणाले, आगामी काळात कोल्हापुरात 90 लाख चौरस फुटांचे बांधकाम पूर्ण होणार असून ग्राहकही मिळवावे लागणार आहेत त्यासाठी मुंबई पुणे कोकण कर्नाटक पर्यंत मार्केटिंग करण्याची गरज आहे . आयटी कंपन्या आल्या की रोजगार वाढवून फ्लॅट ला ही मागणी वाढणार आहे कोल्हापुरात आयटी पार्क साठी प्रयत्न सुरू आहेत पण इथे बिजनेस इन बिझनेस संकल्पना राबविणे आवश्यक आहे . त्यासाठी 50 लोकांनी एकत्र येऊन आयटी पार्क विकसित करूया त्याची सुरुवात दोन लाख चौरस फुटापासून करूया आणि यासाठी क्रीडाई ने पुढाकार घ्यावा.
कोल्हापुरात पूर्ण वेळ नगर सहाय्यक संचालक मिळावेत.क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के पी खोत यांनी प्रास्ताविक केले त्यांनी ऑनलाईन बांधकाम परवाना, शहराचा विकास आराखडा, हद्द वाढ, कॉमन पॅसेजचा घरफाळा, मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका, स्थानिक कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण केंद्र आदी प्रश्न मांडून ते सोडविण्याची मागणी केली.
या उद्घाटन प्रसंगी क्रीडाही कोल्हापूरचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल यांनी जालन प्रदर्शनाची माहिती दिलीया उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा व कोल्हापूरला किमान एक मोठा उद्योग सरकारने द्यावा अशी मागणी केली.
यावेळी आमदार जयंत आसगावकर , क्रीडाइचे उपाध्यक्ष गौतम परमार ,खजिनदार अजय डोईजड, दालन 2024 अध्यक्ष चेतन वसा ,उपाध्यक्ष प्रमोद साळुंखे , प्राधिकरण चे सीईओ संजयसिंह चव्हाण, क्रीडाई चे राजीव परीख, विद्यानंद बेडेकर, महेश यादव, गिरीश रायबागे, अभिजीत मगदूम, संजय शेटे, आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, अतुल पवार ,गणेश सावंत, श्रीधर कुलकर्णी, गौतम परमार उपस्थित होते


