
रोलर आँथलँटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने रोलर आँथलँटीक्स असोसिएशन इंडिया आयोजित पहिली राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा खोपोली जि. रायगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून एस.के. रोलर स्केटिंग अकॅडमीचे श्रीशैल अभिजीत पाटील, धैर्य सुशील ओसवाल, अधिरा ओंकार पाटील, आर्वीत जितेंद्र चोरगे, कविष शैलेश शिंदे, आदित्य सतिश दंडवते, कृष्णा जितेन नेतले, आरवी अनिल कामते, यामी विवेक काळे, हिरण्मयी श्रवणकुमार कारेकर, वेदांतिका संदीप माने, इरा आदेश तेंडुलकर, हरीतेज हर्षवर्धन कोडम, अंजनी सुधाकर पाटील, इरा अमित भोसले, आर्वी किरण व्यास, श्रीतेज अविनाश पाटील, श्रादुल सुरेंद्रसिंग इंद्रेकर, आयुष अमित धर्माधिकारी, सारा मरियम, शेजा फातिमा, आराध्या निरंजन गुळवणी या 22 खेळाडूंची निवड झाली आहे.
या सर्वांना प्रशिक्षक सुहास कारेकर, अध्यक्ष भूपाल शेटे, अभयसिंह जगताप, अजय साळोखे, अमोल साठे, विशाल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंना आमदार मा. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.


