Home Uncategorized सहकाररत्न विलास पाटील फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – बजरंग पाटील

सहकाररत्न विलास पाटील फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद – बजरंग पाटील

4 second read
0
0
261

जिल्ह्याचे नेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न विलास पाटील फाउंडेशने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली. इतर सामाजिक संस्थांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे गौरवउद्गार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी काढले.

मा. विलास पाटील फाउंडेशन व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान ,श्रेष्ठदान या रक्त बँकांनी पुकारलेल्या हाकेला साद देत विलास पाटील फाउंडेशन अणदूरच्या वतीने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविकातून राबवत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी अणदूरचे सरपंच पांडुरंग पाटील , प्रकाश पाटील,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती पाटील , पोलीस पाटील आनंदा गुरव,कृष्णा पाटील, दत्तात्रय गुरव, युवराज पाटील, सुंदर पाटील, सुधाकर पाटील, संदीप पाटील, संकेत पाटील, संभाजी पाटील, विजय टक्के,पंकज पाटील, शरद पाटील, सुखदेव कांबळे, अजित पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…