Home Uncategorized पन्हाळ्यावर श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रम…

पन्हाळ्यावर श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी विविध कार्यक्रम…

3 second read
0
0
146

पन्हाळा : अयोध्या येथे सोमवारी श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पन्हाळ्यावर श्री राम मंदिर देवस्थानच्या वतीने लक्षवेधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पन्हाळावासियांना हा सोहळा अनुभवण्याचे आवाहन श्रीराम देवस्थान मंडळ आणि भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने श्रीराम मंदिर अनोख्या विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तसेच मुख्य गर्भगृह आणि सभामंडप येथे मनमोहक पुष्प सजावट केली आहे. उद्या सकाळी ८ वाजल्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यामध्ये सकाळी अभिषेक,छप्पन भोग, आरती, भजन, रामरक्षा पाठ भाविकांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.तर संध्याकाळी श्री राम भजन व महाआरती संपन्न होणार आहे. तसेच रात्री दीपोत्सव साजरा करुन आतषबाजी करण्यात येणार आहे. त्यानंतर रामभक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी या धार्मिक सोहळ्यात सर्व पन्हाळा वासियांनी सहपरिवार सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम देवस्थान विश्वस्त मंडळ आणि भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…